बदली झालेले कर्मचारी कारवाईस निरुत्साही; परिणामी चोरटे मोकाट शहरात घरफोडीचा धडाकाच

Foto

औरंगाबाद: बदली करण्यात आलेले  पोलीस कर्मचारीना नेमणुकीच्या ठिकाणी न सोडल्याने  कारवाई करून देखील आपल्याला उपयोग होणार नाही या भावनेतून अनेक पोलीस कर्मचारी कारवाई करण्यास निरुत्साही  असल्याची चर्चा आहे. परिणामी शहरातील चोरटे मोकाट झाले असून घरफोडी, लूटमार, दानपेटी चोरी, दुचाकी चोरीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

मे महिन्याच्या काळात पोलीस शिपाई ते साह्ययक उपनिरीक्षक दर्जाच्या  शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांची बदल्या करण्यात आल्या होत्या. या मध्ये गुन्हेशाखेच्या २६ कर्मचारीचा समावेश होत. या २६ कर्मचारी पैकी फक्त ६ ते ७ कर्मचारी सोडण्यात आले आहे. विविध पोलीस ठाणे स्थरावर ठाणेदार बदली झालेल्या कर्मचऱ्याना सोडलेले नाही. त्यामुळे बदली होऊन देखील अनेक कर्मचारी  आहे त्या नेमणुकीच्या ठिकाणीच कार्यरत असल्याचे दिसते. याचाच परिणाम गुन्हे शाखेच्या कारवाई वर होताना दिसत आहे. गुन्हे शाखेत सुमारे आठ पथके आहेत. या पथकातील २६ जुन्या कर्मचाऱ्यांची कार्यकाळ संपल्याने किंवा शासकीय कारणामुळे बदली करण्यात आली होती. मात्र गुन्हेशाखेच्याया  कर्मचाऱ्यांची बदली ज्या ठण्यात करण्यात आली आहे.त्या ठाण्यातील कर्मचारिना ठाणेदारांनी सोडले नसल्याने अनेक कर्मचारी बदली होऊन देखील गुन्हेशाखेतच आहेत. त्यांना बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याची प्रतीक्षा आहे.  गुन्हेशाखेतून बदली झाल्याचा दुःख अनेक कर्मचऱ्याना आहे. आपल्याला दुसऱ्या ठिकाणी नेमणुकीस जाणे आहे .कारवाई करून देखील आपल्याला त्याच उपयोग होणार नाही अशी भावना अनेकांच्या मनात खदखदत आहे. या वृत्ती मुळे अनेक कर्मचारी कारवाई करण्यास निरुत्साही आहेत. याचाच विपरीत परिणाम म्हणून मागील तीन दिवसात प्रचंड घरफोडीचा घटना घडल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून बदली झालेल्या कर्मचऱ्याना त्वरित सोडण्याचे आदेश द्यावे अन्यथा कर्मचार्यांचं गुन्हेगारांवरील करवाईसाठीचा  निरुत्साहीपणा सर्वसामान्यां औरंगाबादकरांच्या आर्थिक मालमत्तेवर बेतले जाईल अशी चर्चा आयुक्तालयात पाहायला मिळाली.

या ठिकाणी चोरांनी मारला डल्ला...
* सारा वैभव सोसायटी मध्ये घराचे कुलूप तोडून ऐवज लंपास.
* पवननगर भागात तीन घरे फोडली
* सिडको भागातील हनुमान मंदिराची दानपेटी फोडली
* जळगाव रोडवर लघु शनकेसाठी थाम्बलेल्या ट्रक चालकास लुटले
* वाळूज महानगर भागातून बंद घरातून लाखोंचे दागिने लंपास
* नंदनवन कॉलोनी भागातील वसुंधरा कॉलॉनीत सात तोळे सोने,रोख सह लाखोंचा ऐवज लंपास